Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिगारेट ओढताना झालेल्या वादातून ब्लेड हल्ला

सिगारेट ओढताना झालेल्या वादातून ब्लेड हल्ला

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

सिगारेट ओढत असलेल्या कॉलेज तरुणावर एका माथेफिरूने ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना वडाळ्यामध्ये उघडकीस आली आहे. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून वडाळा टी टी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी हैदर अली इम्रान शेख (19) याला बेड्या ठोकल्या आहेत.

वडाळा पूर्वेकडील भारतीय कमलानगरमध्ये राहात असलेला हर्शद शेख हा 19 वर्षीय कॉलेज तरुण बुधवारी रात्री येथील सार्वजनिक शौचालयाजवळ सिगारेट ओढत उभा होता. त्याच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या आरोपी हैदर याने तू कोण आहेस अशी विचारणा हर्शदला केली. अनोळखी व्यक्ती आपल्याला विचारत असल्याने हर्शदने, तुमको क्या करना है असे उत्तर त्याला दिले. याचा राग येऊन आरोपी हैदरने त्याला मारहाण करत ब्लेडने हल्ला करुन पळ काढला. स्थानिकांनी जखमी अवस्थेतील हर्शदला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या वडाळा टी टी पोलिसांनी हर्शदच्या फिर्यादीवरुन गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करत हैदरला अटक करण्यात आल्याचे सांगितले.