मुंबई : प्रतिनिधी
प्रेयसी आपल्याला टाळत असल्याच्या रागातून 22 वर्षीय माथेफिरू तरुणाने तिच्यावर ब्लेडने हल्ला करत स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी परळमध्ये घडली. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधनामुळे दोघांचेही प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रफी अहमद किडवाई पोलिसांनी आरोपी प्रियकर पुकार नाटे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पूर्वीचा परळवासीय आणि सध्या डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालेल्या नाटे याचे परळमध्ये राहात असलेल्या 21 वर्षीय तरुणीसोबत गेल्या 7 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. नाटे हा डोंबिवलीमध्ये शिफ्ट झाला असल्याने गेल्या काही वर्षांपासून दोघांनाही रोज भेटणे शक्य होत नव्हते. त्यातच आपल्या प्रेयसीचे आणखी कोणासोबत तरी सुत जुळले आहे आणि वर्षभरापासून ती आपल्याला टाळत असल्याचा नाटेचा समज झाला. यावरुन रोज दोघांमध्ये खटके उडत होते. अखेर याचा सोक्षमोक्क्ष लावण्याचे नाटेने ठरविले.
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ही तरुणी घराबाहेर पडताच नाटेने तिला परेलच्या जेरबाई वाडिया रोड परिसरात अडविले. तु मला का टाळत आहेस, तुझे अन्य कोणा तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु आहेत का असा जाब विचारत नाटेने सोबत आणलेल्या ब्लेडने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:वर सुद्धा वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळताच घडला प्रकार पाहत असलेल्या स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत दोघांनाही उपचारांसाठी तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयाती डॉक्टरांनी दोघांही जखमींवर उपचार सुरू करुन याची माहिती पोलिसांना दिला. घटनेची वर्दी मिळताच रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत जखमी अवस्थेतील तरुणीचा जबाब नोंदविल्यानंतर वरील धक्कादायक घटना समोर आली. अखेर तिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नाटे विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी तरुणावर उपचार पुर्ण झाल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार असल्याचे रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी सांगितले.
Tags : mumbai news, lover, Blade attack, Dombivlikar, lovers, suicide attempt,
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM