Wed, May 22, 2019 06:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल

न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

इन्टाग्रामवर ओळख झालेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे न्यूड फोटो मिळवून ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खार पोलिसांत विनयभंग, आयटी आणि पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच गुजरातच्या सुरत शहरातून समीर युसूफ घासवाला या अठरा वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल आणि सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. 

सदर मुलगी ही सोळा वर्षांची असून ती तिच्या पालकांसोबत खार परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वीच तिची इन्टाग्राम या सोशल मीडियावरून सुरत येथे राहणार्‍या समीर घासवाला याच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही कॉलेज विद्यार्थी असल्याने त्यांची नंतर चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान त्याने तिला तिचे काही न्यूड फोटो शेअर करण्याची विनंती केली होती. तिनेही त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिचे काही अश्‍लील फोटो त्याच्यासोबत शेअर केले होते. मात्र हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत होता.