Thu, Jan 17, 2019 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेअर बाजारात  ‘ब्लॅक फ्रायडे’

शेअर बाजारात  ‘ब्लॅक फ्रायडे’

Published On: Feb 03 2018 2:46AM | Last Updated: Feb 03 2018 2:46AMमुंबई : वृत्तसंस्था

शेअरविक्रीवरील नफ्यावर दीर्घकालीन भांडवली कर लावण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारात 839.91 अंशांची जबरदस्त घसरण झाली. नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण असून गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे जबर नुकसानही झाले आहे. 

839.91 अंशांची जबर घसरण होऊन निर्देशांक 35066.75 अंशांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांतील निर्देशांकाची ही सातवी मोठी घसरण ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 250 अंंशांनी कोसळून 10,760 अंंशांवर बंद झाला. शेअर विक्रीत एक लाखापेक्षा जास्त नफा कमावल्यास 10 टक्के दीर्घ भांडवली नफा कर लागू होणार असून इक्‍विटी म्युच्युअल फंडांनाही 10 टक्के कर लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचा जबर फटका आज शेअर बाजाराला बसला.शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 4.7 लाख कोटींनी कमी झाले. 2500 शेअर्सच्या किमती कोसळल्या, तर 300 शेअर्सनी या पडझडीतही तग धरला.