Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'भुजबळांनी परत त्याच चुका करू नयेत’

'भुजबळांनी परत त्याच चुका करू नयेत’

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 2:13AMठाणे : प्रतिनिधी 

छगन भुजबळ आणि मी 25 वर्षे एकत्र होतो, त्यानंतर ते मला सोडून निघून गेले. त्यांना न्याय मिळाला तो आपण स्वीकारला पाहिजे.  खरेतर त्यांना याआधीच सोडायला पाहिजे होते, पण आता भुजबळांनी पुन्हा त्याच चुका करू नये, असा मैत्रीचा सल्ला माजी मुख्यमंत्री  व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिला. 

ठाण्यात मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, व्यास क्रिएशन्स, पिंताबरी प्रॉडक्ट्स यांच्या वतीने अशोक व शुभा चिटणीस यांनी लिहलेल्या पुस्तकांचे प्रकाशन सहयोग मंदिर येथे जोशी यांच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

युतीची सत्ता असतांना मनोहर जोशी आणि छगन भुजबळ एकत्र होते, त्याची मैत्री सर्वश्रूत होती. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोपात 2 वर्षे कारागृहात असलेले भुजबळ यांची नुकतीच सुटका झाली. याबाबत जोशी यांना विचारले असता, भुजबळ यांच्याबद्दल जोशी सहानुभूती व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केले. भुजबळ यांना मोकळे सोडले असते तरी ते कुठे गेले नसते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

युतीबद्दलच्या आपल्या भावनही जोशी यांनी व्यक्त केल्या. गेली 25 वर्षे भाजप आणि आमची युती आहे.  भाजप सोबत युती असताना मी अनेक पदे भूषविली आहेत. राजकारणात असताना एकमेकांसोबत झालेली भांडण-तंटे विसरायचे असतात. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी याआधीच युतीची घोषणा केली आहे, त्यामुळे युती कायम राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags : Mumbai, mumbai news, Manohar Joshi, Bhujbal Talking, reporter,