Sat, Jun 06, 2020 09:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनानेवाला अंदर

महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, बनानेवाला अंदर

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:48AMमुंबई : प्रतिनिधी

माजी उपमुख्यममंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दोन वर्ष दोन महिन्यानंतर आपल्या निवासस्थानी परतले.  4 मे रोजी त्यांना जामीन मिळाला पण प्रकृती ठीक नसल्याचे ते केईएम  हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. गुरूवारी सकाळी हॉस्पिटलमधून घरी परतताच त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आपल्याला अटक करण्यात आली त्या वास्तुत राहिल्यानंतर भाजपच्याच खासदाराने महाराष्ट्र सदन बहुत सुंदर लेकीन बनानेवाला अंदर अशी टिप्पणी केल्याचे सांगत आपल्या खास स्टाईलमध्ये मिश्किली केली. 

भुजबळ यांनी दि. 14 मे 2016 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना त्यादिवशी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलविले होते. दिवसभर त्यांची चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.  

परत हॉस्पिटलमध्ये जाणार 

गेले तीन ते साडेतीन महिने आपण आजारी असुन स्वादुपिंडाचा त्रास सुरू झाला आहे. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे सांगून भुजबळ यांनी आणखी दोन- चार दिवसातच परत हॉस्पिटलमध्ये दाखल होणार असल्याचे सांगतिले. कदाचित एक दोन शस्त्रकियाही कराव्या लागणार असल्याचे ते म्हणाले. 

मफलर पुन्हा दिसली

राजकारणात वावरणार्‍या भुजबळांनी मफलर वापरून आपली वेगळी ओळख  निर्माण केली आहे. भुजबळ  यांच्या अटकेनंतर राजकारणात दिसणारी मफलर दोन वर्षे दिसत नव्हती, त्याचे आज पुन्हा दर्शन झाले. गंध लावलेले व खांद्यावर शाल घेतलेले भुजबळ घरी परतले. तेव्हा त्यांच्या गळ्यात त्यांची मफलर होती.