Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीच्या चेहर्‍यावर पतीने फेकले उकळते तेल

पत्नीच्या चेहर्‍यावर पतीने फेकले उकळते तेल

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 2:03AM

बुकमार्क करा

भिवंडी ः वार्ताहर

साडी, ब्लाऊजची शिलाई मागितली असता चिडलेल्या पतीने उकळते तेल चेहर्‍यावर फेकून पत्नीला गंभीर जखमी केल्याची घटना नागाव, गायत्रीनगर येथे घडली. जमुना गायकवाड (31) असे जखमी पत्नीचे नाव आहे. विठ्ठल गायकवाड (35) असे आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. 

विठ्ठलचा मित्र घरी आल्याने जमुना त्याच्यासाठी स्टोव्हवर स्वयंपाक करत होती. जर्मनच्या पातेल्यात तिने तेल गरम करण्यास ठेवले होते. त्याचवेळी तिने विठ्ठलकडे साडी व ब्लाऊज टेलरकडे आहे, त्यासाठी साडेतीनशे रुपये लागतील, असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या पतीने उकळत्या तेलाचे पातेले उचलून ते जमुनाच्या चेहर्‍यावर फेकले. त्यात तिचे गाल भाजून दुखापत झाली. तिला स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.