Thu, Nov 15, 2018 22:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘चौकशी समितीचे अध्यक्ष दलित नको’

‘चौकशी समितीचे अध्यक्ष दलित नको’

Published On: Jan 03 2018 4:39PM | Last Updated: Jan 04 2018 9:11AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर याकुब मेनन प्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटात याकुब मेमनचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मात्र, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन त्याच्यावर ३०२ कलमान्वये कारवाई झाली. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींवर देखील याप्रमाणेच गुन्हे दाखल करावेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बंद आंदोलनाचे समर्थन करत आंदोलन मागे घेतल्याची देखील घोषणा केली.  काही हिंदू संघटना अराजकता पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दलित न्यायाधीश नको
मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे स्वागत करताना या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी दलित न्यायाधीश नेमू नये, तसे
केल्यास सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

भीमा-कोरेगाव प्रकरण : मुंबईत तणाव, गाड्यांची तोडफोड

सांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक

कोल्हापुरात दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठिमार (व्हिडिओ)

लातूर : दगडफेकीत सात पोलिस जखमी, एक गंभीर