Mon, May 20, 2019 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमा बंदमध्ये मुंबईतील नुकसान ८८ लाखांचे 

कोरेगाव भीमा बंदमध्ये मुंबईतील नुकसान ८८ लाखांचे 

Published On: Jan 22 2018 1:52AM | Last Updated: Jan 22 2018 1:52AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

भीमा कोरेगाव दंगलीनंतर भारीप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान 2 आणि 3 जानेवारी रोजी मुंबईत सरकारी व खासगी वाहनांचे मिळून तब्बल 88 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. पुढील आठवड्यात तो उपनगर जिल्हाधिकार्‍यांना सादर केल्यानंतर नुकसान भरपाईची कारवाई सुरू होईल. 

2009 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बंददरम्यान झालेल्या तोडफोडीची भरपाई बंद पुकारणार्‍यांकडून करायची आहे. त्यासाठी बंदच्या आयोजकांची मालमत्ता जप्‍त करण्याचे अधिकारही जिल्हाधिकार्‍यांना आहेत. मुंबईत ही भरपाई कशी वसूल केली जाते याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. मुंबईचे उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग खुशवाह यांनी सांगितले की, पोलीस अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी खास तहसीलदार नेमला जाईल.