Wed, Jun 26, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा-कोरेगावप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; 18 आंदोलक ताब्यात

भीमा-कोरेगावप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; 18 आंदोलक ताब्यात

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:51AMमालाड : वार्ताहर

भाजप उत्तर मुंबई, आरकेएचआयव्ही एड्स रिसर्च अ‍ॅण्ड केअर सेंटर यांच्या वतीने मालवणीत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून परतणार्‍या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमा कोरेगाव न्याय हक्‍क समितीच्या रोषास सामोरे जावे लागले. काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा लिंक रोडवरील मीठ चौकी येथे अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी 18 आंदोलकांना ताब्यात घेतले. 

कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. महाराष्ट्र बंददरम्यान तरुण तसेच महिलांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

भीमा- कोरेगाव न्याय हक्‍क समितीचे सदस्य राजा भालेकर यांना पोलिसांनी मध्यरात्रीच ताब्यात घेतले होते. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मालाड पोलिसांनी शनिवारपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती.

मालाड, मालवणी परिसरामध्ये सोशल मीडियावर आंदोलकांनी मेसेज फिरवत वातावरण निर्मिती केली होती. मुख्यमंत्र्यांना सुरक्षा असतानाही त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले.