Sun, May 26, 2019 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पद्मश्रीसाठी भिडे गुरुजींची राज्य सरकारकडून शिफारस

पद्मश्रीसाठी भिडे गुरुजींची राज्य सरकारकडून शिफारस

Published On: Mar 03 2018 1:58AM | Last Updated: Mar 03 2018 1:48AMमुंबई : खास प्रतिनीधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीनंतर वादग्रस्त ठरलेले शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापाक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली होती, अशी माहिती आरटीआयद्वारे उघड झाली आहे. 10 मंत्र्यांच्या एका समितीने पद्मश्री पुरस्कारासाठी 2016 मध्ये संभाजी भिडे यांचे नाव सुचवले होते. मात्र  संभाजी भिडे गुरुजी यांनी यासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता, तसेच त्यांनी पद्मश्री स्वीकारण्यासही नकार दिला होता, असे सांगण्यात येते. 

हिंदुस्थान टाइम्स या दैनिकाने माहितीच्या अधिकारात भिडेगुरूजींची पद्मश्री साठी शिफारस केल्याची माहिती मिळवली आहे. 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे झालेल्या जातीय दंगलीमागे मिलींद एकबोटे आणि भिडे गुरुजींचा हात असल्याचा आरोप होत आहे. याच भिडे गुरुजींना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी 10 मंत्र्यांच्या समितीने शिफारस केली होती. कोण आहेत भिडे गुरुजी?

संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. गेल्या काही दशकांपासून भिडे गुरुजी हे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहीम चालवतात. तसेच शिवाजी आणि संभाजी महाराज यांचे महत्त्व तरुण पिढीला व्याख्यानाच्या माध्यमातून समजावून देतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील तरूणांवर भिडेगुरूजींचा प्रभाव आहे.