Sun, May 26, 2019 15:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडूप : लेप्टोस्पायरसीसने घेतला २७ वर्षीय इंजिनियर तरूणाचा बळी

भांडूप : लेप्टोस्पायरसीसने घेतला २७ वर्षीय इंजिनियर तरूणाचा बळी

Published On: Jul 20 2018 2:44PM | Last Updated: Jul 20 2018 2:43PMभांडूप :प्रतिनिधी

भांडूप पुर्व येथे राहणारा सिद्धेश माणगावकर या तरूणाचा लेप्टोस्पायरसीस्रमुळे आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या शुक्रवारी १३ जुलै रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सिद्धेश ऑफिसहून घरी आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनी, हृदय, फुफुस असे एक एक अवयव निकामी होत गेले आणि आज सिद्धेशने अखेरचा श्वास घेतला. अॅडमिट केल्यापासून सिद्धेश बेशुद्धावस्थेत होता. तो शुद्धीत आलाच नाही. सिद्धेशचे आई-वडील आणि एक बहीण आहे. कर्ज काढून मुलाला इंजिनियर केलेल्या आईवडीलांचा आधार हरपल्याने हळहळ व्‍यक्‍त होत आहे.