Tue, Nov 20, 2018 06:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : भाजपकडून हेमंत पटलेंना उमेदवारी

भंडारा पोटनिवडणूक: भाजपकडून हेमंत पटले

Published On: May 08 2018 1:56PM | Last Updated: May 08 2018 1:59PMमुंबई - पुढारी ऑनलाईन 

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून माजी आमदार हेमंत पटले मैदानात उतरले आहेत. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

पोटनिवडणुकीत आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल असे पक्षाचे नेते आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजपला रामराम करत खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. तर याच जागेसाठी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हे सुद्धा उमेदवारीच्या रांगेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांकडे लक्ष आहे.