Mon, May 20, 2019 22:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट ते मेट्रो एकाच तिकिटावर मार्चपासून 

बेस्ट ते मेट्रो एकाच तिकिटावर मार्चपासून 

Published On: Feb 24 2018 1:41AM | Last Updated: Feb 24 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रोसह ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम 1 मार्चपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात येत असलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. 
प्रवाशांना कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करता यावा व वेळ वाचण्याच्या उद्देशाने महानगर प्रदेशातील सर्व सार्वजनिक वाहतूक यंत्रणांसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली (इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम) तयार करण्यात येत आहे. ही तिकिट प्रणाली अकाउंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठुनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे.

या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रवाशांची सोयीसाठी ही तिकिट प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच फक्त मुंबई महानगरा पुरतेच स्मार्ट कार्ड न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी.