Fri, Nov 16, 2018 04:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलमान खानची ‘बिईंग ह्युमन’ काळ्या यादीत?

सलमान खानची ‘बिईंग ह्युमन’ काळ्या यादीत?

Published On: Feb 18 2018 8:49AM | Last Updated: Feb 18 2018 8:49AMमुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूडचा दबंगस्टार सलमान खानची ‘बिईंग ह्युमन’ ही संस्था चर्चेत आली आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी सलमानच्या बिईंग ह्युमन फाऊंडेशन या संस्थेची निवड केली होती. मात्र, संस्थेने अद्याप कामाला सुरुवात न केल्यामुळे महापालिकेने या संस्थेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सव्वा वर्षे उलटल्यानंतरही सलमानच्या संस्थेने कामाला अजूनही सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मुंबई पालिका ‘बिईंग ह्युमन’ला काळ्या यादीत टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर 12 डायलेसिस केंद्रे उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून 2016 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. महापालिकेपेक्षा तीन टक्के दराने कमी किमतीत ‘बिईंग ह्युमन’कडून डायलेसिसची सुविधा देण्यात येणार होती.