होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हरिभाऊ बागडेंवरील अविश्‍वास ठराव मागे

हरिभाऊ बागडेंवरील अविश्‍वास ठराव मागे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्‍वासाचा ठराव विरोधकांनी मागे घेतला. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.

विरोधकांनी अध्यक्षांवर हा ठराव दाखल केला होता व तो कार्यक्रमपत्रिकेत दाखविण्याची मागणी ते वारंवार करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी या ठरावावर चर्चा घेऊ, असे सांगितले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे उभे राहून विधानसभा अध्यक्षांवर विश्‍वास व्यक्‍त करत असल्याचा ठराव मांडला. त्याला शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन देताच आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर झालेल्या गदारोळात कामकाज तहकूब करण्यात आले.

मंगळवारच्या कार्यक्रमपत्रिकेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, असा एक ओळीचा विरोधकांनी दाखल केलेला ठराव दाखविण्यात आला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व अन्य सदस्यांनी हा ठराव दिला होता.


  •