Fri, Mar 22, 2019 00:09
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मार्च अखेर; महसूल अधिकाऱ्यांची वसूली जोमात  

मार्च अखेर; महसूल अधिकाऱ्यांची वसूली जोमात  

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड : श्रीकृष्ण बाळ 

आर्थिक वर्ष ३१ मार्च अखेर जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने महाड पालिकेने शहरात  तर वीज वितरण कंपनी महसूल प्रशासनाने शहरासह तालुक्यात वसुली मोहीम दोन दिवसांच्या सुटीच्या कामांतूनही जोरात सुरू ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून महाड शहरात नगरपालिका तसेच विद्युत वितरण कंपनी मार्फत थकबाकी असणारया ग्राहकांना व नागरिकांना आपली मागील बाकी भरण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकामार्फत गावोगावी फिरून देण्यात येत आहेत.

या संदर्भात माहिती झालेल्या प्राथमिक माहितीनुसार विद्युत वितरण कंपनीला सुमारे 4 कोटी 50 लक्ष रुपयांची वसुली 31 मार्च अखेर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी अठ्ठावीस मार्चअखेर सुमारे 3 कोटी 90 लक्ष रुपयांपर्यंत वसुली झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

महाड उपविभाग कार्यक्षेत्रांतर्गत एकूण पंचावन्न हजार वीज ग्राहक असून यापैकी आठशे पन्नास कारखानदार दोन हजार घरगुती तर उर्वरीत ही व्यावसायिक ग्राहकांच्या विद्युत जोडणी असल्याची माहिती विद्युत वितरण कंपनी महाड यातून प्राप्त झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वसुलीची टक्केवारी अधिक ठेवण्याबाबत मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना  देण्यात आल्याने दोन दिवसांच्या सुटी असूनही वीज मंडळाचे सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचारी येत्या दोन दिवसात जास्तीत जास्त वसुली करण्यात कामी तालुक्यात रवाना झाल्याचे  चित्र महाड शहरातील कार्यालयातून दिसून आले.   

महाड नगरपालिकेनेही  मागील वर्षापेक्षा जास्त वसुली करण्याचा संकल्प केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आत्तापर्यंत 73 टक्के  सुमारे एवढी वसुली झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाड पालिकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असून असलेल्या कर्मचाऱयांवरच दैनंदिन कार्यालयाच्या कामांसह वसुलीची जबाबदारी देण्यात आली असून  जास्त वसुली करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मागील दहा वर्षांमध्ये शहरात इमारतींची संख्या वाढल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जावुन वसुली करणे कामी अनंत अडचणीना सामोरे जावे लागत आहे .शहरात इमारतींसह व्यावसायिक क्षेत्रातील ची संख्याही वाढल्याने नगरपालिकेवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. वसुलीसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाड शहरात एकूण 11 हजार 749  प्रॉपर्टीज आहेत यापैकी  घरगुती पद्धतीमधून 9528    व्यावसायिक स्तरातून  2221 संख्या आहे .  

महाडपालिकेची आज पर्यंत थकबाकी 3 कोटी 98 लाख रुपये असुन यापैकी या वर्षीची  वसुली सुमारे दोन कोटी बावीस लाख एवढी आहे सन दोन हजार तेरा सालापासूनचा अनेक थकबाकीदारांची रक्कम बाकी असून आकडेवारी 1कोटी 75 लाखांवर जाऊन पोहोचली आहे यापैकी काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असून काही लोकांची दुकानांचे गाळे, दुकाने बंद असल्याने वसुली होणे अशक्य झाले आहे . याप्रमाणे महाड नगरपालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले मंडई मधील  व बाहेरील व्यावसायिक दुकानेही बंद झाल्याने या रकमाही कमी होतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली असून मागील वर्षी 84 टक्के एवढी वसुली करण्यात आली होती आज पावेतो 73 टक्क्यांवर पोचली असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

यामध्ये आगामी चार दिवसात किमान पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचे संकेत प्रशासनाच्या सुत्रांकडून प्राप्त झाले असून मागील वर्षापेक्षा वसुली जास्त करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी अधिक श्रम घेऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर महाड महसूल प्रशासनालाही शासनाने सुमारे पाच कोटी रुपयांचे उद्दिष्ट वसुली कमी आर्थिक वर्षाच्या अखेरीस करण्याचे आदेश दिले आहेत .यापैकी सुमारे चार कोटी रुपयांपर्यंतची महसुली वसुली शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत करण्यात आल्याची माहिती महाड प्रांत कार्यालयातून प्राप्त झाली आहे. 

या तीन विभागांकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेने विविध स्तरांवरील ग्राहक नागरिकांमध्ये वसुली कामी येणारे पथक पाहता राहिलेली थकबाकी तातडीने भरण्याकडे कल दिसत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने आगामी काळात अधिक महसूल प्राप्त होईल असे संकेत प्राप्त होत आहेत.
 

Tags : 31 march, Revenue, Collection, Mahad Municipal Carporation, 


  •