Tue, Mar 19, 2019 15:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांना लुटताहेत ब्युटी पार्लर्स

मुंबईकरांना लुटताहेत ब्युटी पार्लर्स

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 2:38AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी स्पा किंवा सलूनमध्ये जाणे आता नित्याचे झाले आहे. काही गरज म्हणून तर काही स्टेटस सिंबॉल म्हणून हा मार्ग अवलंबतात. परंतु, या सेवा देणारी सेंटर्स ग्राहकांना लुटत असल्याचे शासकीय अधिकार्‍यांनी टाकलेल्या धाडीत आढळून आले असून किंमतीत अशी हेराफेरी करणारी 28 ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर्स’ मुंबईत आढळून आली आहेत. 

लिगल मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशनकडे (एलएमओ) काही प्रसिद्ध स्पा अ‍ॅण्ड सलून्स ग्राहकांना देण्यात येणार्‍या सौंदर्य प्रसाधनाच्या प्रॉडक्ट लेबल्समध्ये फेरफार करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन शहरातील काही प्रसिद्ध स्पा अँड सलून्सवर टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल 28 हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर्समध्ये प्रॉडक्टच्या मूळ किंमतीपेक्षा भरमसाठ वाढीव किंमतीने हा माल ग्राहकांना विकत असल्याचे दिसले. 

उत्पादकांचे डिटेल्स, प्रॉडक्टवरचे 

एमआरपी टॅग्ज पुसून काढणे, वाढीव एमआरपीचे खोटे स्टीकर चिपकवणे असा करामती वेलनेस सेंटर्सनी केल्या. काही स्पा अँड सलून्स सौंदर्य प्रसाधनाचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांना लेबल विरहीत माल पाठवण्याची विनंती करीत असल्याचे व त्याप्रमाणे कंपन्या माल पाठवत असल्याचेही आढळून आले.