Fri, Apr 26, 2019 17:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएसटीवरील तिरंग्याचा मान राखा

सीएसटीवरील तिरंग्याचा मान राखा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी ब्रिटीश साम्राज्याच्या पाऊलखुणा आजही तशाच आहेत. त्यांच्या वसाहतवादाची प्रतीके आजही जागोजागी भारतीय प्रतीकांपेक्षा काकणभर अधिक मानाने मिरवत आहेत. त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीबाहेर राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याच्या पायाजवळ तिरंगा फडकत असतो. दिनेश हळदणकर या सामाजिक कार्यकर्त्याने याबाबतची तक्रार विविध ठिकाणी केली असून, राष्ट्रपतींच्या कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. चुनाभट्टी येथे राहणारे दिनेश हळदणकर यांनी राष्ट्रपती, स्मृती इराणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्याशी विविध विषयांवर पत्रव्यवहार केला होता. 

व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण करुन वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. अलिकडेच या नावाचाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा विस्तार करण्यात आला आहे. मात्र अजूनही रेल्वे इंडिकेटरवर एसटी असाच उल्‍लेख करण्यात येत आहे, असे हळदणकर यांनी या सर्वांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या कळसावर व्हिक्टोरिया राणीाचा पुतळा आहे. भारताचा राष्ट्रध्वज या पुतळ्याच्या पायाशी फडकत आहे. तो अधिक उंचावर न्यावा, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, कुर्ला चुनाभट्टी येथे बंद असलेल्या स्वदेशी मिलच्या ठिकाणी  विविध उद्योग सुरु करावेत, अशा मागण्याही त्यांनी केल्या होत्या.

राष्ट्रपतींच्या कार्यालयाने या सर्व मागण्यांची दखल घेतली असून, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी पत्रव्यवहार केला आहे. हळदणकर यांच्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करावी आणि त्यासंबंधीची माहिती याचिकाकर्त्याला द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.  

 

Tags : mumbai, mumbai news, CST, indian national flag, respected,


  •