Thu, Jul 18, 2019 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत नमाजावरून दोन गटांत तुफान हाणामारी

भिवंडीत नमाजावरून दोन गटांत तुफान हाणामारी

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 12:34AM

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

भिवंडी शहरातील प्रसिद्ध कोटरगेट मशिदीमध्ये ईषाच्या नमाजाची वेळ बदलण्यात आल्याने विश्‍वस्तांमध्ये वादविवाद होवून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
दोन्हीं गटाच्या 23 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कोटरगेट मशीदचे व्यवस्थापन रजा अ‍ॅकॅडमी या सामाजिक संस्थेमार्फत पाहिले जात आहे. या मशिदीत मौलाना युसूफ रजा आणि शकील रजा असे दोन गट कार्यरत आहेत. युसूफ रजा यांना पाच महिन्यांपूर्वी मुख्य विश्‍वस्त पदावरून हटवण्यात आले आहे. तेव्हापासून दोन्ही गटात सातत्याने वादविवाद होत आहेत. 

शनिवारी रात्री कोटरगेट मशिदीच्या मदरशामध्ये मशीद व्यवस्थापनाच्या चर्चेसाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी युसूफ रजा गटाने ईषाच्या नमाजाची 8 वाजताची वेळ बदलून रात्री 10 ची केली. याचा जाब शकील रजा गटाने विचारला असता दोन्ही गटांमध्ये वादविवाद होवून धुमश्‍चक्री उडाली. दोन्ही गटाकडून लाकडी दांड्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. यात युसूफ रजा गटाचे अब्दुल रहीम मुहम्मद शेख, युसूफ मोमीन, अब्दुल मोमीन तर शकील रजा गटाचे हासिम अन्सारी व कासीम अन्सारी गंभीर जखमी झाले आहेत.