Wed, Jul 17, 2019 08:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 

राज्यात बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 

Published On: Mar 17 2018 1:43AM | Last Updated: Mar 17 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यांत स्वतंत्र परिचर्या संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ठाणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग, अमरावती येथे त्याची सुरुवात होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली. 

वैद्यकीय क्षेत्रात नर्सिंग हा खूपच महत्वाचा घटक आहे. मात्र जेवढी गरज आहे तेवढे मनुष्यवळ उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन भारतीय परिचर्या परिषदेच्या निर्देशानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. त्याचबरोबर परिचारकांच्या भत्यात वाढ करावी, अशी मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विक्रम काळे, नागो गाणार, हेमंत टकले आदी सदस्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली असून तीन भत्यांत वाढ केली जाईल, असे स्पष्ट केले. राज्यातील सर्व जीएनएम अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण 2022 पर्यंत करणे अपेक्षित आहे. 

Tags : mumbai, mumbai news, B.Sc, Nursing Course,