Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘बारायण’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी

‘बारायण’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

बारायण चित्रपटात संभाजी राजेवरील प्रसंग प्रदर्शित करून राजेशिर्के घराण्याची बदनामी करण्यात आली आहे. चित्रपटातील हा आक्षेपार्ह भाग वगळून निर्मात्यांनी समस्त राजेशिर्के घराण्याची माफी मागावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा श्री कुलस्वामिनी शिरकाई देवी सेवा मंडळ, मुंबई संस्थेचे निशांत राजेशिर्के व विनायक राजेशिर्के यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.

चित्रपटातील एका प्रसंगामुळे राजेशिर्के घराण्याची मानप्रतिष्ठा व सन्मानाला बाधा पोहोचली असून महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातसह अन्य राज्यांतील राजेशिर्के  घराण्याचा भावनेचा खेळ बारायण चित्रपटात मांडण्यात आला आहे. राजेशिर्के घराणे हे पूर्वीपासून ते आजपर्यंत छत्रपती राजघराण्याशी अत्यंत निष्ठने राहिले आहे,असे असताना राजेशिर्के घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निशांत व विनायक राजेशिर्के यांनी सांगितले.याबाबत दिग्दर्शक दीपक पाटील यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आल्याचे विनायक राजेशिर्के यांनी सांगितले. चित्रपटात संभाजी राजेवरील प्रसंग दाखविताना अयोग्य माहिती देऊन विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राजेशिर्के यांनी केला आहे .दरम्यान या प्रकारामुळे राजेशिर्के घराण्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.