Tue, Jul 16, 2019 14:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकांना शेअर बाजारात ७० हजार कोटींचा फटका

बँकांना शेअर बाजारात ७० हजार कोटींचा फटका

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 19 2018 8:41PMमुंबई : वृत्तसंस्था 

पीएनबीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारतीय बँकांचे शेअर बाजारातील भांडवली मूल्य तब्बल 70 हजार कोटी रुपयांनी घटले आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजारातील बँकेक्स हा निर्देशांक 28732 वरून घसरून 28113 पर्यंत आला आहे. तब्बल सुमारे 615 अंकांच्या या घसरणीने हे नुकसान झाले आहे. 

पीएनबीपाठोपाठ रोटोमॅकच्या कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. काही बँकांच्या शेअरच्या किमती तर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पीएनबीच्या शेअरची किंमत 28 टक्क्यांनी उतरली असून भांडवली मूल्यात 10 हजार 976 कोटींची घट झाली आहे. एसबीआयचे मूल्य 18 हजार, तर बँक ऑफ बडोदाचे मूल्य 5634 कोटी रुपयांनी घटले आहे.