Thu, Nov 15, 2018 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकॉक-मुंबई विमानाचा धावपट्टीवर टायर फुटला

बँकॉक-मुंबई विमानाचा धावपट्टीवर टायर फुटला

Published On: Feb 13 2018 3:01AM | Last Updated: Feb 13 2018 3:01AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

थाई एयरवेजच्या बँकॉक-मुंबई विमान धावपट्टीवर उतरत असतानाच टायर अचानक फुटल्याने खळबळ उडाली. या विमानात 292 प्रवासी होते. सोमवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, टायर फुटल्यानंतर त्याच्या हादर्‍याने धावपट्टीवर मोठा खड्डा पडला व मातीचा ढिगाराही दिसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत हा सलग दुसरा विमान अपघात आहे. दोनच दिवसांपूर्वी एयरइंडिया आणि विस्ताराची विमाने मुंबईच्या अवकाशात एकमेकांवर आदळता-आदळता राहिली. एयर इंडियाच्या महिला पायलट अनुपमा कोहली यांच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी दुर्घटना टळली. आपल्या बाजूनेच विस्ताराचे विमान येत असल्याचे दिसताच कोहली यांनी आपल्या विमानाची दिशा क्षणाधार्त बदलत विस्ताराच्या विमानाचा मार्ग मोकळा केला. नाहीतर दोन्ही विमाने समोरासमोर धडकली असती.