Sun, Jul 21, 2019 10:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : इमारतीला आग; चिमुकलीचा मृत्यू

मुंबई : इमारतीला आग; चिमुकलीचा मृत्यू

Published On: Jan 22 2018 3:57PM | Last Updated: Jan 22 2018 3:57PMमुंबई : प्रतिनिधी

वांद्रे पश्चिमेकडील टर्नर रोडवर असलेल्या शोएब मंजिल या इमारतीला दुपारी सव्‍वा बाराच्‍या सुमारास आग लागली. यामध्ये दोन लहान मुली होरपळल्या असून एकीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. देवी धनु (वय दिड वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर उमा धनु (वय अडीच वर्ष) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्‍ये उपचार करण्‍यात येत आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. 

शोएब मंजिल इमारतीजवळ असलेल्या पंपरुमच्या इलेक्ट्रीक वायरिंगला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्यासोबत अग्निशमन दलाच्या जवनांनी घटनास्‍थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. 

घटनास्थळी अग्नीशामक दल, महापालिका अधिकारी, पोलीस दाखल झालेहोते. त्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच आमदार आशिष शेलार यांनीही महापालिकेने घटनेची तात्काळ चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.