Thu, Jan 17, 2019 10:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रामदास भटकळ यांना बाळशास्‍त्री जांभेकर अनुवाद पुरस्‍कार

रामदास भटकळ यांना बाळशास्‍त्री जांभेकर अनुवाद पुरस्‍कार

Published On: Aug 22 2018 9:20PM | Last Updated: Aug 22 2018 9:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक गो. वि. उर्फ विंदा करंदीकर यांनी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीतून आद्य पत्रकार, अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने उत्कृष्ट भाषांतरकाराला बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार देण्यात येतो. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१७ या वर्षातील हा पुरस्‍कार रामदास भटकळ यांनी अनुवाद केलेल्या ‘इंडियन होम रूल हिंद स्वराज’ या ग्रंथाला देण्यात आला आहे. 

गांधी विचारांचे अभ्यासक रामदास भटकळ यांनी ‘हिंद स्वराज - इंडियन होम रूल’चा अनुवाद पहिल्यांदाच मराठीत उपलब्ध करून दिला आहे. या ग्रंथालामुळे गांधीविचार मराठीतून समजून घ्यायला मदत होणार आहे. ‘इंडियन होम रूलचे गांधी’ या लेखात गांधींच्या तत्कालीन विचारसरणीवर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. गांधी-नेहरू विसंवाद यासंबंधी काही महत्त्वाच्या पत्रांचा अनुवादही यामध्ये देण्यात आला आहे. 

या पुस्तकाची निवड प्रफुल्ल शिलेदार, चंद्रकांत भोंजाळ, डॉ. रणधीर शिंदे आणि जयश्री श्रीहरी जोशी यांच्या समितीने केली.