Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वॅक्स म्युझियममध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मेणाचा पुतळा

वॅक्स म्युझियममध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मेणाचा पुतळा

Published On: Dec 27 2017 10:15AM | Last Updated: Dec 27 2017 10:15AM

बुकमार्क करा
लोणावळा : वार्ताहर

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा पुतळा लोणावळ्यातील सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बसविण्यात आला आहे. वॅक्स म्युझियमचे सुनील कंडलूर यांनी हा पुतळा साकारला असून, पुतळा बघण्यासाठी वॅक्स म्युझियममध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

लंडन येथील मादाम तुसाँच्या धर्तीवर लोणावळ्यात सुरू करण्यात आलेल्या सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये देश पातळीवरील विविध राजकीय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड व हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खा. श्रीरंग बारणे व मान्यवर उपस्थित होते. लवकरच संग्रहालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रिपाइंचे नेते रामदास आठवले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पुतळे दाखल होणार असल्याचे सुनील कंडलूर यांनी सांगितले.