Thu, Jul 18, 2019 00:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील घटना रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील घटना रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:35AMजोगेश्वरी : वार्ताहर

पालिकेच्या जोगेश्‍वरी पूर्वेतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात  परविंदर गुप्ता (27) या रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यावर येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

परविंदर गुप्ता यांना 21 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर नसल्याने  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. रुग्णालयात सफाईचे काम काढल्यामुळे त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या डोळ्याला उंदराने चावा घेतला, अशी माहिती  परविंदरचे वडील रामप्रताप गुप्ता यांनी दिली.

ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात परविंदर यांच्यावर उपचार सुरू होते. 10 लाख रुपये खर्च झाल्याने पुढील उपचार परवडत नसल्याने त्यांना  ट्रॉमा रुग्णालयात नेण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला.  या सर्व प्रकाराचा ट्रॉमा रुग्णालय प्रशासनाने इनकार केला आहे. रुग्णाच्या अंगावरून उंदीर गेला.  मात्र, तो त्यांना चावला नाही. काही दिवसांपासून त्याचा डोळा लालसर आहे. गुप्ता यांची रुग्णालयातील चार डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असून सर्व वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक ट्रॉमा रुग्णालयाची बदनामी करून खोटे आरोप करत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बछाव यांनी सांगितले.

Tags : Mumbai, mumbai news, Balasaheb Thackeray Hospital incident, Patients eye, Mouse bite,