Thu, Nov 15, 2018 09:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तराखंडच्या ट्रेकिंगमध्ये बदलापूरकराचा मृत्यू

उत्तराखंडच्या ट्रेकिंगमध्ये बदलापूरकराचा मृत्यू

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 1:56AM



बदलापूर : वार्ताहर

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना हर्षद आपटे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात घडली. 33 वर्षांचा हर्षद विवाहित असून त्याला 5 वर्षांची मुलगीही आहे. या आकस्मिक घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर 

दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले. हर्षद हा बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात राहणारा होता. 7 जून रोजी तो त्याच्या 11 जणांच्या टीमसोबत उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता ज्यात 4 जण बदलापूरचे, तर इतर 7 जण उर्वरित महाराष्ट्रातले होते. 2 परदेशी ट्रेकर्सही या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत होते. 9 जून रोजी या सर्वांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. 15 जून रोजी ते ट्रेक संपवून बेस कॅम्पकडे परतत होते.

मात्र वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर अचानक हर्षदला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास यामुळे अत्यवस्थ झालेल्या हर्षदला तातडीने खाली आणण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. हर्षद हा पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याला ट्रेकिंगचा छंद असल्याने महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यापूर्वी सर केल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.