Tue, Jul 23, 2019 16:45



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी 

मुंबई शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी 

Published On: Jan 22 2018 11:12AM | Last Updated: Jan 22 2018 11:13AM



मुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये 105.66 अंकांची वाढ होत तो 35 हजार 617.24 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्ये देखील 8.85 अंकांची वाढ होत तो 10 हजार 903.55 अंकांवर पोहोचला. 

सेन्सेक्समधील आघाडीच्या 30 शेअर्समध्ये पहिल्या सत्रातच 102.39 अंकांची वाढ झाली. त्यामुळे निर्देशांक 35 हजार 613.97 अंकांवर तर निफ्टीतील आघाडीचे 50 शेअर्समध्ये 11.5 अंकांची वाढ होत तो 10 हजार 883.20 अंकांवर खुला झाला. याआधी शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 251.29 अंकांची वाढ होत तो 35 हजार 511.58 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी देखील 10 हजार 894.70 या नव्या विक्रमी स्तरावर बंद झाला होता.  

गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये 740.53 अंकांची तर निफ्टीमध्ये 77.70 अंकांची वाढ झाली आहे.