Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीपीटी भूखंड आरक्षण सेनेने रोखले!

बीपीटी भूखंड आरक्षण सेनेने रोखले!

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:08AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या पूर्व सागरी किनार्‍याचा विकासाकरिता केंद्रीय मंत्री भाजपा नेते नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. यासाठी शिवडी येथील औद्योगिक वापराचे आरक्षण असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भूखंडाचे आरक्षण ट्रान्सपोर्टशन झोन असे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी सुधार समितीत मंजुरीसाठी आला असता, तो पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने रोखून धरला. 

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. मुंबई ट्रान्स- हार्बर लिंक प्रकल्पासाठी शिवडी येथील 10 हजार 89 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. पण या जमिनीवर सध्या आद्यौगिक वापराचे आरक्षण आहे. हे आरक्षण ट्रान्सपोर्टशन झोन करण्यासाठी शासनाने पालिकेला विनंती केली आहे. शिवडी येथील हा भूखंड सार्वजनिक उद्दिष्टासाठी आरक्षित नाही. ही जमीन विकास नियोजित रस्त्याने बाधित आहे. यातील काही जमीन औद्योगिक व निवासी पट्ट्यात मोडते. तर काही जमिनीवर उद्यान व परवडणार्‍या घरांचे आरक्षण आहे. ही जमीन मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मालकीची आहे. त्यामुळे 2014-34 च्या विकास आराखड्यात या जमिनीबाबत अनेक हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या आहेत.