Thu, Apr 25, 2019 14:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कमला मिलच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

मुंबई : कमला मिलच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

Published On: Dec 30 2017 1:11PM | Last Updated: Dec 30 2017 1:18PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील कमला मिल कम्पाऊंडमध्ये भीषण अग्नितांडव झाले. वन अबाव्ह या रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला तर 41 जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने अतिक्रमणावर कारवाईची मोहिम हाती घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज कमला मिलच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. कमला मिलच्या परिसरात अतिक्रमण केलेले बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. यामध्ये कमला मिल, रघुवंशी मिलचे कंपाऊंड आणि फोनिक्स मॉलच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे.

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत हिरा पन्ना मॉल, चायना गार्डन, रिव्हायव्हल रेस्टॉरंट, कृष्णा पॅलेस, रोजवूड हॉटेल, अंजली बिल्डिंग यांसह परिसरातील अनेक हॉटेल मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कमला मिल आगप्रकरणी दोषी असलेल्यांना पोलिसांनी लूक आऊट नोटीस पाठवली आहे. यातील ३ आरोपींना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची पाचपथके रवाना झाली झाली आहेत.

कमला मिल आगप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.  

Brihanmumbai Municipal Corporation's (BMC) demolition drive against illegal structures in #KamalaMills area of #Mumbai, a fire that broke out here late Thursday night, claimed 14 lives. pic.twitter.com/qODi4TGeae

— ANI (@ANI) December 30, 2017