Tue, Oct 24, 2017 16:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत?

सत्तासमीकरणात शिवसेनेचा 'सिक्सर'

Published On: Oct 13 2017 3:57PM | Last Updated: Oct 13 2017 5:07PM

बुकमार्क करा

 

मुंबई : प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांशी संपर्क तोडल्याचे बोलले जात आहे. विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सहाही नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका आयुक्त अजेय मेहता यांची फेरीवाल्यांना हटविण्यासाठी भेट घेतली होती. त्यावेळी मनसेच्या सात नगरसेवकांपैकी एकमेव दिलीप (मामा) लांडे उपस्थित होते. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांवर शिवसेनेचा डोळा असण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मनसे नगरसेवकांना शिवसेना कोकण विभागीय आयुक्तांकडे  घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मनसेनेही आमचा केवळ एकाच नगरसेवकाशी संपर्क झाल्याचे म्हटले आहे. मनसेच्या या सहा नगरसेवकांना थेट शिवसेनेते प्रवेश करता येणार नाही. तर, त्यांचा एक गट तयार केला जाईल आणि तो सभागृहात शिवसेनेला पाठिंबा देईल, अशी सूत्रे हालणार आहेत.   

भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्याने महापालिकेत भाजपचे संख्याबळ एक सदस्याने वाढले, तर त्याचवेळी शिवसेनेचा एक सदस्य कमी झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेकडून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातूनच मनसेच्या पाच नगरसेवकांना एकाचवेळी फोडण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचे बोलले जाता आहे.