Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दृष्टिक्षेपात मुंबईचा शैक्षणिक अर्थसंकल्प 

दृष्टिक्षेपात मुंबईचा शैक्षणिक अर्थसंकल्प 

Published On: Feb 03 2018 2:42AM | Last Updated: Feb 03 2018 2:39AMयंदा वाढीचा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षी महापालिकेने शिक्षणासाठी 2 हजार 311 कोटी रुपयांची तरतूद करणारा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात 257.69 कोटींनी वाढ करून यंदा 2 हजार 569 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा  मोफत बस प्रवास सुरूच राहणार आहे. 1 हजार 187 शाळांतील 2 लाख 96 हजार 815 गणवेषधारी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी 50 कोटी, तर माध्यमिकसाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅब वाटण्यासाठी एकूण 18 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिकसाठी 6 तर माध्यमिकसाठी 12 कोटी आहेत.

डिजीटल क्‍लासरुमसाठी प्राथमिकसाठी 31.50 कोटी आणि माध्यमिकसाठी 5.88 कोटींची तरतूद

शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी तसेच विकास आराखड्यातील 12 भूखंडांवरील नवीन शाळा उभारणीसाठी व 7 शालेय मैदानांच्या विकासासाठी 277.67 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेच्या 381 शालेय इमारतींमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 4 हजार 064 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार त्यासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 5 हजार 416 वर्गखोल्यांमध्ये ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारणी केली जाणार आहे. यासाठी प्राथमिक साठी 11.58 कोटी आणि माध्यमिकसाठी 63.25 कोटी आहे.

शालेय मध्यान्ह पोषण आहारासोबत प्रथिनयुक्त सुका मेवा किंवा तत्सम पदार्थ देण्यासाठी पूरक पोषण आहारासाठी 27.38 कोटींची तरतूद केली आहे.

396 नवीन बालवाड्या सुरु करण्याचा प्रस्ताव

गुणवत्तावाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे  शिक्षण देणार्‍या 24 शाळा सुरू करणार  त्याद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सहावी ते आठवी इयत्तेमधील 345 इमारतींमध्ये 381 सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन बसवणार. सहावी ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोझेबल पाऊचची खरेदी करणार. त्यासाठी एकूण 2.50 कोटी रुपयांची तरतूद. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मनपा शाळांत ई लायब्ररी सुरू करणार. त्याअंतर्गत 25 ग्रंथालयांत संकेतस्थळ, संगणक, इंटरनेट, ई पुस्तक सेवा उपलब्ध केल्या जातील.

उर्दू अध्यापक विद्यालयांतील अधिव्याख्याता आणि अर्धवेळ शिक्षक संवर्गातील 22 रिक्त पदे भरणार

प्राथमिक शिक्षणासाठी शासनाकडून मनपाला 68 कोटी 06 लाख रुपये तर माध्यमिक शिक्षणासाठी मनपाला राज्य शासनाकडून 57 कोटी 55 लाख रुपये अनुदानाची गरज 

पालिकेचे विद्यार्थी फुटबॉल प्रशिक्षणासाठी जाणार जर्मनीला  

पालिकेच्या विद्यार्थ्यांना जर्मनीचा फुटबॉल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी फुटबॉल क्‍लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिल्हा असोशिएशनची मदत घेतली जाणार आहे. रोड टू जर्मनी कार्यक्रमांतर्गत मनपा विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे (एमडीएफए) अध्यक्ष असल्याने पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या दौर्‍याला महत्व प्राप्‍त झाले आहे. आदित्य यांच्या मागणीनुसार ही तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींसाठी 681 नवीन सॅनिटरी व्हेंडिंग मशिनची खरेदी केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि इतर वेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सूचना देणे सोयीचे होण्यासाठी सर्व शाळांमध्ये ध्वनिक्षेपक बसवण्यात येणार आहेत. यात प्राथमिक विभागासाठी 11.58 कोटी तर माध्यमिक विभागासाठी 64. 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.