Sat, Feb 16, 2019 07:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनसाठीच्या बीकेसीतील जमिनीची किंमत वसूल करणार

बुलेट ट्रेनसाठीच्या बीकेसीतील जमिनीची किंमत वसूल करणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

बुलेट ट्रेन प्रकल्पात टर्मिनल बनवण्यासाठी राज्य सरकारकडून बांद्रा-कुर्ला संकुलमधील (बीकेसी) जी जागा देण्यात आली होती, त्या जागेची किंमत वसूल करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. बीकेसीमधील जमिनीसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) साडेतीन हजार कोटी रूपये द्यावे लागणार आहेत. एमएमआरडीएकडून लवकरच यासंबंधीचे 3 हजार 512 कोटी रुपयांचे बिल रेल्वे ऑथोरिटीला पुढील महिन्यात पाठविण्यात येणार आहे.

बुलेट ट्रेनसाठी हाय स्पीड रेल कॉरिडॉरचे निर्माण करण्यात येणार आहेे. याचे एक स्थानक बीकेसीमध्ये बनवण्यात येणार आहे. एमएमआरडीए बीकेसीमधील ही जमीन देण्यास बर्‍याच अडथळ्यानंतर तयार झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत होते. 27 फेब्रुवारी 2018 रोजी जमीन सोपवण्यात आली. 

0.9 हेक्टर जागा सोपवण्यात आली आहे. तिची किंमत 1 हजार 240 कोटी अशी आहे, तर 3.3 हेक्टर इतकी जागा ही जमिनीच्या खाली असणार आहे. तिची किंमत 2 हजार 273 कोटी रूपये इतकी आहे. असे एकूण 3 हजार 512 कोटी रूपयांचे बिल तयार करण्यात येणार आहे. जमीन मोफत देणार नाही, हे आधीच ठरले आहे, असे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी स्पष्ट केले आहे.   

Tags : mumbai, bullet train, land,  BKC, will recover the cost, 


  •