Sun, Oct 20, 2019 02:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलणार!

बीकेसीतील कार्यालयीन वेळा बदलणार!

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:42AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला बीकेसी प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

एमएमआरडीएने विशेष प्राधिकरण म्हणून वांदे्र-कुर्ला संकुलाच्या विकासावरही एमएमआरडीएने लक्ष दिले आहे. तसेच पूर्व-पश्चिम उपनगरांतील विकासकामांना वेग देण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात मेट्रो मार्ग व लिंक रोडवरील पर्यायी जोडमार्गाच्या कामामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होणार असल्याचा अंदाज बांधत बीकेसीतील कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला बीकेसी प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.      
वांदे्र-कुर्ला संकुल येथे कुलाबा-वांदे्र-सीप्झ या भुयारी मेट्रो-3 चे काम सुरू आहे. तसेच नव्या वर्षात डी.एन.नगर ते मंडाले ते मानखुर्द या मेट्रो-2 ब मार्गिकेचे कामही सुरू होणार असून या दोन्ही प्रकल्पांमुळे बीकेसीतील अरुंद रस्ते आणखी अरुंद होणार आहेत. मेट्रो 2 ब दरम्यान एमएमआरडीए कार्यालय, प्राप्तिकर कार्यालय व आयएलएफएस कार्यालयात अशी तीन स्थानके आहेत. सध्या कुर्ला आणि वांद्रे येथून विशेष बसेस चालवण्यात येतात. अनेक वित्त कंपन्या, हिरे व्यापारी, जागतिक दर्जाची रुग्णालये, प्रदर्शनासाठी     /...11पान 1 वरून... असणारी मोकळी मैदाने, खाजगी कंपन्यांची मुख्यालये यामुळे दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र सायंकाळी सातनंतर येथील रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसते. मेट्रो कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बीकेसीतील कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात येऊन सकाळ आणि दुपार अशा दोन शिप्टमध्ये काम करण्यात येणार असल्याबाबत एमएमआरडीएने संबंधित कार्यालयांकडे सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. यापैकी बीकेसी प्रॉपर्टी असोसिएशनने हिरवा कंदील दाखवला आहे.