Thu, Feb 21, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप कार्यकर्त्यांची पोलिसाला मारहाण

भाजप कार्यकर्त्यांची पोलिसाला मारहाण

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 1:33AMविरार : वार्ताहर 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यावरून झालेल्या बाचाबाचीत भाजपच्या कार्यकर्त्याने पोलिसाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी विकास चौधरी (25), पवन पांडे (20) या दोघांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन कार्यकर्ते गुरुवारी दुपारी तक्रार घेऊन विरार पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी  विरोधात असलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यावरून पोलीस ठाण्यात वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अशोक परजने मध्ये आले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  

शुक्रवारी सकाळी विरारमधील भाजपाच्या कार्यकत्यांनी पोलीस ठाण्यातील दोघांना सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तर, पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.