Sat, Nov 17, 2018 23:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमधील गुन्हेगारी भाजपच मिटवेल : योगी आदित्यनाथ

पालघरमधील गुन्हेगारी भाजपच मिटवेल : योगी आदित्यनाथ

Published On: May 23 2018 8:50PM | Last Updated: May 23 2018 8:53PMपालघरः पुढारी ऑनलाईन

पालघरमधील गुंडागिरी, माफियागिरी संपवायचे काम फक्त एकच पक्ष करू शकतो तो म्हणजे भाजप. असे वक्तव्य येथील जाहीर सभेत बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शिवसेनेवर नाव न घेता टीका करताना ते म्हणाले की, सत्तेत राहून पाठीत सुरा खूपसणाऱ्या पक्षाला या निवडणुकीत थारा देऊ नका. मराठीतून भाषणाला सुरूवात करत त्यांनी पालघरवासियांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला.

मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश प्रगती पथावर चालला आहे. सरकारने राबवलेल्या योजना लोक कल्याणकारी आहेत. मुद्रासारख्या योजनेतून तरूणांना स्व:तचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले योगी-

*नाव शिवसेनेचे घेतात आणि काम अफझलखानाचं करतात-योगींचा शिवसेनेवर हल्लाबोल

*वनगा कुटूंबियांच्या प्रकरणात शिवसेनेनं नाक खुपसण्याचं काहीही कारण नव्हतं. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न होता 

*बाळासाहेबांना कुणीच कधी विसरू शकत नाही, कारण बाळासाहेबांनी कधी पाठित खंजीर खुपसला नाही 

*चिंतामन वनगा संसदेत माझे मित्र होते, पालघरच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं 

*राज्य कसं चालवावं हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं 

*मोदी जगात जिकडे कुठे जातात, तिथे लाखोंच्या संख्येत लोक स्वागत करतात