Tue, May 26, 2020 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंदुरीकर महाराजांची तपश्चर्या वाया घालवू नका : चंद्रकांत पाटील 

इंदुरीकर महाराजांची तपश्चर्या वाया घालवू नका : चंद्रकांत पाटील 

Last Updated: Feb 17 2020 1:05PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.17) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पण, एका वक्तव्याने त्यांची तपश्चर्या वाया घालवू नका, असा सल्ला दिला. त्यांनी वक्तव्य चुकीचे आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. पण, एका वक्तव्याने माणूस वाईट होत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या इंदुरीकर महाराजांचे समर्थनच केले. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. भाजप 25 फेब्रुवारीला राज्यभर 400 ठिकाणी शेतकरी आणि महिलांच्या प्रश्रावरुन आंदोलन करणार आहे याची माहिती देणे हा या पत्रकार परिषदेचा मूळ उद्येश होता. पण, याच पत्रकार परिषदेत त्यांनी इंदुरीकर महाराज यांचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केल्याने तो पत्रकार परिषदेचा महत्वाचा मुद्दा बनला. 

पाटील इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर, 'इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, त्यांने के वक्तव्य करायला नको होते. पण एका वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही, एका वाक्याने माणसाची तपश्चर्या वाया घालवू नका.' असे म्हणत माध्यमांना सल्ला दिला. तसेच त्यांनी इंदुरीकर महाराजांची किर्तने जनप्रबोधनासाठी असतात असेही ते म्हणाले. दरम्यान, अनिसने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करणारा असा तक्रार अर्ज दाखल केला आहे. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटे बोलतात, विरोधात बसण्याचा जनादेश मिळूनही ते सत्तेत बसले. आम्ही सरकार पाडणार नाही, पण हे सरकार पडणार हे नक्की.