आमदार फोडण्यासाठी भाजपची २५ ते ५० कोटींची ऑफर : वडेट्टीवार यांचा आरोप

Last Updated: Nov 09 2019 1:32AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी भाजपवर आमदार फोडाफोडीचा थेट आरोप केला. आमदार फोडण्यासाठी भाजपकडून 25 ते 50 कोटींची ऑफर दिली जात आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटींची ऑफर दिली गेली, असे आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

आमचा एकही आमदार फुटणार नाही. भाजपकडून जर कोणत्याही आमदाराला फोन आले, तर ते सर्व फोन टॅप करावेत. त्याच्या विरोधात पुरावे गोळा करावेत आणि त्यांचे कारस्थान जगासमोर आणावे, अशा सूचना आम्ही सर्व आमदारांना दिल्या असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आमचे आमदार सुरक्षित आहेत. कोणालाही जयपूरला पाठवले नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

जे आमदार जयपूरला गेले असतील, ते व्यक्‍तिगतरीत्या आपल्या कुटुंबीयांसोबत फिरायला गेले असतील. निवडणुकीच्या काळात सर्वजण थकले असल्याने ते फिरण्यासाठी गेले असावेत असे वडेट्टीवार म्हणाले. इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आपल्याला फोन आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सत्ता स्थापनेसाठी भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. शिवसेना आणि भाजपला जनतेने बहुमत दिले आहे. त्यांनी सरकार बनवावे. मात्र आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, जर कुणी फुटलेच, तर त्याच्यापुढे आम्ही सर्वांच्या वतीने कॉमन उमेदवार उभा करून फुटलेल्या आमदाराला आम्ही पाडू आणि त्याला राजकारणातूनच हद्दपार करू, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोल्हापूर : नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'


औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ