Sun, Jul 21, 2019 14:49
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : भाजप नगरसेवकाची चोरी पकडली(Video)

ठाणे : भाजप नगरसेवकाची चोरी पकडली(Video)

Published On: May 12 2018 12:37PM | Last Updated: May 12 2018 12:36PMउल्हासनगर : पुढारी ऑनलाईन

उल्हासनगर महापालिकेमधील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी उल्हासनगर महापालिका कार्यालयातून फाईल चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सदर फाईल कोणती होती याबाबत अद्याप तपास सुरु आहे. या फाईल चोरी प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.

प्रदीप रामचंदानी हे भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक असून उल्हासनगर शहरातील अनेक ठेकेदारांचे ते नेते असल्याचे बोलले जाते. नगरसेवक झाल्यावर त्यांनी ठेकेदारीचे काम आपल्या मुलाच्या नावावर करुन ते सध्या भाजप वर्तुळातील वादग्रस्त व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. या प्रकरणाने भाजपच्या 'गोल्डन गॅंग'मध्ये खळबळ उडाली असून, हे प्रकरण कसे दाबायचे याबद्दल भाजपच्या सर्वत्र गुप्त बैठका सुरू आहेत. या प्रकरणावरून महापालिका आयुक्त गणेश पाटील यांनी सीसीटीव्हीची चित्रफीत पाहून याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. 

Tags : BJP, councillor, file stolen, thane, ulhasnagar, pradip ramchandani,