होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमित शहांची मातोश्रीकडे धाव, उद्या उध्दव ठाकरेंची भेट

अमित शहांची मातोश्रीकडे धाव, उद्या उध्दव ठाकरेंची भेट

Published On: Jun 05 2018 8:12AM | Last Updated: Jun 05 2018 8:18AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्यावर एनडीएतील घटकपक्षांची चलबीच सुरु झाली आहे. बिहारमधील जनता दल (युनायटेड)च्या प्रवक्त्यांनी महागाईवरुन भाजपचे कान उपटले आहेत. तर पालघर पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जास्तच कटुता आली आहे. त्यामुळे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहे. उद्या सायंकाळी ते उध्दव ठाकरेंची भेट घेतील.

पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला आता आपल्या मित्रपक्षांची आठवण झाली आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवटणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या या पराभवामुळे त्यांचे मित्रपक्ष JD(U) मध्ये चलबीच सुरु झाली आहे. त्यांनी पहिल्यांदाच पेट्रोल दरवाढीवरुन भाजपचे कान उपटले आहेत. तर महाराष्ट्रात पालघर पोटनिवटणुकीत भाजप आणि शिवसेना थेट मैदानात होते. त्यावेळीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला अफजलखान म्हटल्याने आधीच ताणलेल्या संबधांत जास्तच कटुता आली आहे.

या सर्व पाश्वभूमीवर भाजपच्या अध्यक्षांनी मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जात आहे. २०१९ मध्ये जर भाजप बहुमतापसून दूर राहिला तर त्यांना मित्रपक्षांची गरज भासेल त्यातच चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राहिलेले पक्ष शिवसेना आणि जद(यु) यांच्याशी संबध सुधारणे गरजेचे आहे. त्याच पाश्वभूमीवर अमित शहा उद्या मातोश्रीवर जावून उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

वाचा : शिवसेनेचे खरे नाही; स्वबळाची तयारी ठेवा!

शिवसेना निवडणुकपूर्व युती करण्याच्या मानसिकतेत सध्या नाही हे मुख्यमंत्र्याना उमजल्यानेच त्यांनी नुकतेच भाजप कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारीला लागा असा सल्ला दिला आहे.  

 

Tags : Mumbai, Mumbai news, BJP president Amit Shah, visit matoshri, amit shah meeting with  Uddhav Thackeray, NDA