Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

Published On: Jan 30 2018 1:02PM | Last Updated: Jan 30 2018 1:02PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पालघरमधील भाजपचे खासदार, अॅड. चिंतामण वनगा यांचे हृदय विकाराच्या झटक्‍याने निधन झाले. वनगा यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्‍यांना राम मनोहर लोहिया रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

चिंतामण वनगा हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते, आदिवासी समाजातील वनगा यांनी आपल्या कार्यशैलीमुळे पक्षात वेगळे स्थान प्राप्त केले होते. त्यांनी १९९०-९६ या कालावधीत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९९६ ला ते प्रथम लोकसभेत निवडून गेले. १९९९ साली दुसऱ्यांदा लोकसभेत विजयी झाले. १९९९-२००० या कालावधीत शहरी आणि ग्रामीण विकास समितीचे ते सदस्य होते. तसेच ते २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा  विजयी झाले.

अनुसूचित जाती आणि जमाती विकास समिती, ग्रामविकास स्थायी समिती आणि कृषी मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते.