Tue, Jan 22, 2019 22:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपा सरकार उद्योगपतींचे : आप

भाजपा सरकार उद्योगपतींचे : आप

Published On: Feb 13 2018 4:28PM | Last Updated: Feb 13 2018 4:28PMमुंबई : प्रतिनिधी

देशातील सर्वसामान्यांना अच्छे दिनाची मोठी स्वप्न दाखवत केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. भाजपा सरकार सामान्य जनतेसाठी काम करत नाही तर केवळ उद्योगपतींचे हीत साधत असून, अडाणी, अंबानी यांचा हजारो कोटींचा फायदा करून देत असल्याची टीका आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंग यांनी  केली. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश मध्ये करण्यात आली, त्यांना कर्जमाफी सोडा शेतमालाल योग्य भाव सुद्धा भाजपा सरकार देऊ शकले नाही. युवकांना रोजगार देण्याऐवजी नोट बंदी, जीएसटी यासारखे निर्णय व्यापारी वर्गावर थोपवून बेकारी व महागाईत भर घालण्याचे काम भाजपा सरकारकडून केले जात आहे. दुसरीकडे अडाणी, अंबानी, व्हिडिओकोन यासारख्या ठराविक उधोजकांची जवळपास 8 लाख 50 हजार रुपयांची कर्ज माफ केली जात असल्याची टीका संजय सिंग यांनी केली. मुबंईत झालेल्या या पत्रकार परिषदेस आप नेते आशुतोष गुप्ता, सुधीर सावंत, प्रीती मेमन-शर्मा आदी उपस्थित होते.

भाजपा सरकारच्या काळात न्याय व्यवस्था सुरक्षित राहिलेली नसून न्या. लोहिया हे त्याच एक उदाहरण आहे. लोहिया प्रकरणात देशातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे. राफेल विमान खरेदीत घोटाळा नसेल तर त्या संदर्भातील व्यवहाराची कागदपत्रे सरकार का उघड करत नाही, असा प्रश्न आम आदमी पार्टीने केला आहे.