Tue, Jul 16, 2019 22:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत भाजपा नगरसेवक  खंडणीखोरीने गोत्यात!

भिवंडीत भाजपा नगरसेवक  खंडणीखोरीने गोत्यात!

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:32AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरातील कामतघर येथील शामदनी हाईट्सच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळी करून 20 लाखांची खंडणी उकळणार्‍या तीन जणांविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक तथा पालिकेतील भाजपा गटनेता निलेश चौधरी, प्रभाग समिती क्र. 3 चे सभापती हनुमान चौधरी, नगरसेविका योगिता पाटील यांचे पती महेश पाटील यांचा यामध्ये समावेश असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. 

शहरातील कामतघर परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यापैकी शहरातील कासारआळी गोकुळनगर येथे राहणारे बिल्डर विकासकुमार राठी यांनी कामतघर परिसरात शामदनी हाईट्स या इमारतीचे बांधकाम केले आहे. हे काम सुरू ठेवण्यासाठी कामतघर भागातील स्थानिक नगरसेवक तथा भाजपा गटनेता निलेश चौधरी, प्रभाग समिती क्र. 3 चे सभापती हनुमान चौधरी तसेच महेश पाटील यांनी राठी यांच्याकडून 60 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी सन 2012-13 सालापासून त्यांनी 20 लाख रुपये घेतले आणि उरलेल्या रक्कमेची मागणी करीत त्यांनी वेळोवेळी शिवीगाळी करून मारहाण केली. 

तसेच इमारत बांधकाम व्यवसाय बंद पाडण्याची, कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार बिल्डर विकासकुमार राठी यांनी ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदिप शर्मा यांच्याकडे केली. त्यानुसार नारपोली पोलीस ठाण्यात नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी व साथीदार महेश पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही .

Tags : mumbai, mumbai news, Bhiwandi, BJP corporator, ransom racket,