Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण पदवीधरसाठी  भाजपचा ‘संकल्प’ जाहीर

कोकण पदवीधरसाठी  भाजपचा ‘संकल्प’ जाहीर

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 12:54AMठाणे  : प्रतिनिधी 

कोकण पदवीधर मतदारसंघाचा ‘संकल्प’ जाहीर करताना भारतीय जनता पक्षाने बेरोजगार पदवीधरांबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावरही भर दिला असून,  कोकणात किनारा पर्यटनाचे धोरण तयार करुन राबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रविवारी सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संकल्पाचे प्रकाशन भाजपचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शिक्षकांसह कुटुंबियांना आकर्षक विमा योजना, वरिष्ठ निवडश्रेणी, शिक्षकांचे सरकारकडे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. कृषीविषयक शिक्षकांना बिनव्याजी कर्ज, भरतीवरील बंदी उठविण्याबाबत प्रयत्न आदी संकल्प भाजपने केले आहेत. जिल्हा परिषद व नगरपरिषदांमधील शिक्षिकांच्या मुलांसाठी पाळणाघरे, चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासही प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. 

मुली-महिलांसाठी वसतीगृहे

कोकणातून मुंबईत नोकरी वा शिक्षणासाठी येणार्‍या महिला व मुलींसाठी वसतीगृह, कृषी महाविद्यालयात महिलांना मोफत प्रशिक्षण, प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड व्हेंडीग मशीन बसविण्याला प्राधान्य दिले जाईल. लघुउद्योजिका घडविण्यासाठी प्रशिक्षण व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.