मुंबई: पुढारी ऑनलाईन
भाजप अध्यक्ष अमित शहा आजपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. पण, भाजपने जाहीर केलेल्या अमित शहांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रकात ‘मातोश्री’चा उल्लेखही नसल्याने ही भेट होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
अमित शहा मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी थेट आमदार आशिष शेलार यांचे घर गाठले. अमित शहा आणि काही नेत्यांची ‘रंगशारदा’मध्ये बैठक सुरू झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शहा ‘बकेटलिस्ट’फेम माधुरी दीक्षितच्या भेटीला रवाना झाले.
भाजपकडून जाहिर झालेला अमित शहांचा नियोजित कार्यक्रम
दु. 1.45 - मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात विश्रांती
दु. 4.30 - उद्योगपती रतन टाटा यांची भेट
संध्या. 5.30 – पेडर रोड इथे लता मंगेशकर यांची भेट
6.45 – प्रभादेवी- सिद्धिविनायकाचं दर्शन
7.00 वा – वांद्रे- आशिष शेलार यांच्या निवासस्थानी भेट
9.45 वा – मलबार हिल – सह्याद्री अथितीगृहात मुक्काम