Fri, Nov 16, 2018 05:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसची एवढी भीती वाटते का? स्थानबद्ध निरुपम यांचा शहांना सवाल

काँग्रेसची एवढी भीती वाटते का? : संजय निरुपम

Published On: Jun 06 2018 12:47PM | Last Updated: Jun 06 2018 12:53PMमुंबई : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी  म्हणून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी अंधेरी येथील राहत्या घरी स्थानबद्ध केले आहे. यापूर्वी ज्यावेळी शहा मुंबईत आले होते तेव्हा वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना स्थानबद्द केले होते.

निरुपम यांनी अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विरोधी भूमिका घेतली नव्हती. कोणतेही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला नसताना आपल्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई कशासाठी असे निरुपम यांनी म्हटले आहे.  अमित शहा यांना काँग्रेसची एवढी भीती वाटते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थइत केला आहे.