Tue, Feb 19, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपची ऑफर; राणे वेट करणार की राज्यसभेवर जाणार?

भाजपची ऑफर; राणे वेट करणार की राज्यसभेवर जाणार?

Published On: Mar 01 2018 5:16PM | Last Updated: Mar 01 2018 5:29PMमुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या भेटीनंतर राणेंनी भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. भाजपच्या या ऑफरचा विचार करुन निर्णय घेऊ असे राणे यांनी सांगितले.

वाचा : आचरा पंचायतीवर राणेंच्या 'स्वाभिमान'ची सत्ता; शिवसेनेचा मोठा पराभव

राज्यातील भाजप नेत्यांची बुधवारी दिल्लीत विशेष बैठक पार पडली. यावेळी भाजपाचे  मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. पुढील महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार असून महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा थंडावल्यानेच भाजपने राणेंना खासदारकीची ऑफर दिली आहे.

मागील वर्षी नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसची साथ सोडली होती. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगत असताना त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.