Tue, Apr 23, 2019 09:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आंबेडकरांच्या नावात 'राम' असल्याचा प्रचार करतील'

'आंबेडकरांच्या नावात 'राम' असल्याचा प्रचार करतील'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन राजकारण करायला भाजप कमी पडणार नाही, अशी टीका भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांच्या नावात रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव अनिवार्य करण्याच्या निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला. यावर प्रकाश आंबडकरांनी टीका केली. बाबासाहेबांच्या नावात राम असल्याचा प्रचार करायलाही भाजप कमी पडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. 

आंबेडकर हे मराठीत सही करताना भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करायचे तर इंग्रजीमध्ये ते बी आर आंबेडकर अशीच सही करत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी देखील टीका केली आहे. दलितांची मते मिळवण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.   

उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेब  भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत असल्याचा दाखला देत यापुढे बाबासाहेबांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाईल, असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला. यासाठी खास विधेयक पास करण्यात आले.

उत्तर प्रदेश राज्यातील मायावतींच्या बसपानेही राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या देशाततील अनेक दलित नागरिकांच्या नावात राम हा शब्द आहे. त्याचा प्रभू रामचंद्रांशी काही संबंध आहे की नाही यावरून वाद आहेत, असे  सांगत  सरकारच्या निर्णया निराशजनक असल्याचे म्हटले आहे.

Tags : BJP, Indirectly Plan,  BR Ambedkar,  Ram Bhakt,  2019 Election,  Praksh Ambedkar 


  •